Namdev Gharal
बीव्हर हा असा प्राणी आहे ज्याला ‘जंगलाचा अभियंता’ म्हटले जाते. कारण हा प्राणी छोट्या प्रवाहांमध्ये एक डॅम बांधतो. यासाठी ताे झाडे, फांद्या, गवत आणि चिखल वापरताे
याला Beaver Dam म्हणतात. या डॅममुळे तलाव तयार झाल्यावर त्याच्या मधोमध डॅमच्या खाली बीव्हर आपले घर बांधतो.
त्याच्या घराचे प्रवेशद्वार हे पाण्याखाली गुप्त असते, ज्यामुळे कोल्हे, लांडगे, अस्वल यासारख्या शिकारी प्राण्यांपासून त्याचे संरक्षण होते
आपल्या तीक्ष्ण पुढच्या दातांनी तो झाडे कुरतडतो, व पाण्यात पाडतो. तसेच फांद्या कुरतुडून ओढून न नेतो. चिखल व फांद्यांनी एक धरण तयार करतो.
हा प्राणी प्रामुख्याने उत्तर अमेरिका, युरोप आणि कॅनडा या थंड प्रदेशातील नद्या, ओढे व तलावांच्या आसपास आढळतो
तसेच या प्राण्याला दाट तपकिरी फर असते जी थंडीपासून त्याचे संरक्षण करते. तसेच सपाट, रुंद शेपूट पोहताना संतुलन साधण्यासाठी आणि धरण बांधताना उपयोगी पडते
याचा प्रमुख आहार पाने, साल, झाडांची फांदी, गवत, जलवनस्पती असते. हे बिव्हर सामूहिक काम करणारे व अंत्यत परिश्रम करणारे प्राणी असतात.
त्यांच्या या धरणामुळे पाण्याचा प्रवाह नियंत्रित होतो. पाण्याचे छोटे-छोटे तलाव तयार होतात. याचा फायदा म्हणजे त्यांच्या घराला सुरक्षित वातावरण मिळते.
हे बीव्हर डॅम पर्यावरणासाठी उपयुक्त मानले जातात कारण ते नैसर्गिक जलसाठा व जैवविविधतेचे संवर्धन करतात
या डॅममुळे त्या परिसरात ओलसर जागा तयार होतात. यामुळे मासे, पक्षी, बेडूक व इतर प्राणी यांना चांगले अधिवास मिळतात