पुढारी वृत्तसेवा
धावपळीचे जीवन आणि सतत काम करण्याचा दबावा शरीरात 'स्ट्रेस हार्मोन्स' जास्त प्रमाणात तयार होतात, ज्यामुळे हार्मोन्सचे नैसर्गिक संतुलन बिघडते.
जास्त काळ तणाव घेतल्यास शरीरात 'कॉर्टिसोल' नावाचे हार्मोन वाढते. यामुळे रक्तातील साखर (इन्सुलिन) आणि थायरॉईडच्या कामात अडथळे येतात.
जास्त ताणामुळे मेंदूतील मासिक पाळी नियंत्रित करणार्या ग्रंथींवर परिणाम होतो. यामुळे पाळी वेळेवर येत नाही.
मानसिक ताण शरीरातील LH आणि FSH या दोन महत्त्वाच्या हार्मोन्सचे संतुलन बिघडवतो, परिणामी नपुंसकतेसारखे विकार निर्माण होऊ शकतात
संशोधनानुसार, सततचा ताण थायरॉईड ग्रंथीच्या कामात अडथळा आणतो, ज्यामुळे थायरॉईडचे आजार होऊ शकतात.
जेव्हा आपण जास्त तणावात असतो, तेव्हा जास्त भूक लागते आणि शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
दीर्घकाळ ताण राहिल्यामुळे आपण जे अन्न खातो, त्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याची शरीराची पद्धत बिघडते, ज्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो.
ताणामुळे होणाऱ्या बदलांमुळे भीती वाटणे (Anxiety), सतत उदास वाटणे (नैराश्य) आणि गोष्टी लक्षात न राहणे (स्मरणशक्ती कमी होणे) अशा समस्या उद्भवू शकतात.