पुढारी वृत्तसेवा
सॅनिटरी पॅड वेळेवर न बदलणे
पॅड 6–8 तासांपेक्षा जास्त वापरल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
खाजगी भागाची योग्य स्वच्छता न ठेवणे
दिवसातून किमान दोन वेळा स्वच्छता न केल्यास इन्फेक्शन होऊ शकते.
सुगंधी साबणांचा वापर
केमिकलयुक्त किंवा सुगंधी साबण वापरल्याने त्वचेची नैसर्गिक समतोल बिघडतो.
हात न धुता पॅड बदलणे
हात स्वच्छ न ठेवल्यास जंतुसंसर्गाचा धोका वाढतो.
ओले किंवा घट्ट कपडे घालणे
अशा कपड्यांमुळे घाम आणि ओलावा वाढून संसर्ग होऊ शकतो.
पाळीत आंघोळ टाळणे
आंघोळ न केल्यास स्वच्छता कमी होते आणि अस्वस्थता वाढते.
पाणी कमी पिणे
पाळीत शरीराला जास्त पाण्याची गरज असते, पण अनेकजणी ते दुर्लक्ष करतात.
वेदना आणि त्रास दुर्लक्षित करणे
अतिशय वेदना किंवा अनियमित पाळी डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.
मेंस्ट्रुअल हायजीनबाबत गैरसमज
गैरसमजांमुळे चुकीच्या सवयी लागतात, ज्या आरोग्यासाठी घातक ठरतात.