पुढारी वृत्तसेवा
निरोपाचा सर्वात सोपा शब्द: Bye
दिवसभरात आपण अनेकदा 'बाय' (Bye) म्हणतो, पण तुम्हाला माहीत आहे का की हा शब्द आला कुठून?
'Bye' हा केवळ शब्द नाही, तर शॉर्ट फॉर्म आहे
आपल्याला वाटतं 'Bye' हा एक स्वतंत्र शब्द आहे, पण प्रत्यक्षात हे एका मोठ्या वाक्याचे लघुरूप आहे.
काय आहे याचा इतिहास?
सोळाव्या शतकात निरोप घेताना ' God be with you' (देव सदैव तुझ्यासोबत राहो) असे म्हणण्याची पद्धत होती.
काळानुसार बदलत गेलं स्वरूप
कालांतराने हे वाक्य बदलत गेलं. ' God be with you' चे रूपांतर 'God be with ye' आणि नंतर 'Goodbye' मध्ये झाले.
धार्मिक संदर्भातून उत्पत्ती
जुन्या काळी प्रवास धोकादायक असायचा, म्हणून एकमेकांना देवाच्या स्वाधीन करण्यासाठी हे वाक्य वापरले जात असे.
'God' चा झाला 'Good'
१७ व्या शतकाच्या अखेरीस 'Good Day' किंवा 'Good Night' च्या प्रभावामुळे 'God' शब्दाच्या जागी 'Good' शब्द आला आणि 'Goodbye' लोकप्रिय झाले.
'Goodbye' चा छोटा भाऊ - 'Bye'
पुढच्या काळात सोयीनुसार 'Goodbye' मधील 'Good' काढून फक्त 'Bye' हा शब्द संभाषणात रूढ झाला.
आता सांगा, तुम्हाला हे माहीत होतं का?
पुढच्या वेळी कोणाला 'बाय' म्हणताना हा रंजक इतिहास नक्की आठवा आणि मित्रांनाही ही माहिती शेअर करा!