लिंबूमधून जास्तीत जास्त रस काढायचाय? 'या' आहेत भन्नाट टीप्स

मोनिका क्षीरसागर

लिंबू निवडताना ते नेहमी पातळ सालाचे आणि जास्त वजन असलेले लिंबू निवडा, यात रस जास्त असतो.

लिंबू कापण्यापूर्वी ते गरम पाण्यात ५ मिनिटे भिजवून ठेवा, यामुळे लिंबाचे तंतू मोकळे होतात.

लिंबू १० ते २० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास रस काढणे सोपे होते.

लिंबू कापण्यापूर्वी, ते ओट्यावर ठेवून तळहाताने हलकेच गोल फिरवा.

काही लोक लिंबाचा रस काढण्यापूर्वी ते स्वच्छ कापडात हलकेच दाबतात, ही देखील एक प्रभावी पद्धत आहे.

लिंबाला एक छोटेसे छिद्र पाडून काटा किंवा टूथपिक वापरून दाबल्यास थेट रस बाहेर पडतो.

लिंबू जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवू नका, कारण यामुळे रस आटतो.

या टीप्स वापरून तुम्ही तुमच्या प्रत्येक लिंबूतून जास्तीत जास्त आणि उत्तम रस काढू शकता

येथे क्लिक करा...