Masoor Dal Dosa Recipe : घरगुती नाश्तासाठी मसूर दाळ डोसा सोप्या पद्धतीने बनवा

अंजली राऊत

दिवसाची सुरुवात निरोगी आणि चविष्ट नाश्त्याने करण्यासाठी हा मसूर दाळ डोसा सर्वोत्तम पर्याय आहे

बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ आहे, असा डोसा ऑफिस टिफिनमध्ये किंवा घरगुती नाश्त्यात बनवू शकता

मसूर डाळ डोसा ही एक उत्तम पौष्टीक रेसिपी असून त्यात आढळणारे प्रथिने आणि फायबर शरीरासाठी फायदेशीर असल्याने बराच वेळ भूक लागत नाही

लागणारे साहित्य असे.. मसूर डाळ - 1 कप, तांदूळ - अर्धा कप, आले - 1 अर्धा तुकडा, हिरवी मिरची 2, मीठ - चवीनुसार तसेच पाणी - आवश्यकतेनुसार आणि तेल - शेकण्यासाठी

सर्वप्रथम, डाळ आणि तांदूळ चांगले धुवून घ्या आणि 3-4 तास भिजत घाला

नंतर मिक्सरमध्ये आले, हिरवी मिरची आणि थोडे पाणी घालून बारीक पेस्ट बनवा

तयार केलेली पेस्ट एका भांड्यात काढा, मीठ घाला आणि 15-20 मिनिटे रेस्ट करायला ठेवा

गरम तव्यावर पातळ डोसा बनवण्यासाठी तो गोल आकारात पसरवा, नंतर तो दोन्ही बाजूंनी सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या

आता तुमचा कुरकुरीत मसूर डोसा तयार असून चटणी आणि सांबारसोबत गरमागरम खा

Jowar bhakri | Pudhari
Chapati vs Bhakri: चपाती की भाकरी? वजन कमी करण्यासाठी काय खावे?