Namdev Gharal
गॅलापागोस बेटावर मिळणारा हा मरीन इग्वाना सेम गॉडझिलासारखा दिसतो. गॉडझिला चित्रपटात अक्राळविक्राळ दिसणारा डायनॉसॉर कुळातील प्राणी धडकी भरवणारा होता.
पण हा छोटा गॉडझिला म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण याचे रंगरुप हे गॉडझिालासारखेच असते. पण हा आहे इग्वाना याचा आकार छोटा असतो पण त्यांचा लूक आणि सवयी एखाद्या प्रागैतिहासिक जीवासारख्या वाटतात.
हे एकमेव सरपटणारा प्राणी आहे जो पाण्यात गोता मारतो. कारण याचे खाद्य हे समुद्राच्या तळाशी भेटते, ३० मिनिटांपर्यंत श्वास रोखून धरु शकण्याची क्षमता या मरीन इग्वानाकडे असते
समुद्रातील तळाशी भेटणारे एक प्रकारचे शेवाळ हे याचे प्रमुख अन्न आहे. हे सरडे अन्नासाठी समुद्रात ३० ते ५० फूट खोलवर डुबकी मारू शकतात.
त्यांचा चेहरा रागीट, अंगावर काटेरी खवले आणि पाठीवर टोकदार कणा असतो. त्यांचा रंग प्रामुख्याने काळा किंवा गडद करडा असतो, ज्यामुळे त्यांना गॉडझिलाचे छोटे रूप म्हटले जाते.
यापाठिमागे बायॉलॉजिकल कारण आहे हा काळा रंग त्यांना समुद्राच्या थंड पाण्यातून बाहेर आल्यावर सूर्याची उष्णता वेगाने शोषून घेण्यास मदत करतो.
समुद्राचे खारे पाणी पोटात गेल्यामुळे त्यांच्या शरीरात मिठाचे प्रमाण वाढते. हे जादा मीठ बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडे नाकाजवळ खास ग्रंथी असतात. ते अनेकदा शिंकल्यासारखे करून नाकातून मिठाचे फवारे हवेत उडवतात.
हे प्राणी 'शीत रक्ताचे' (Cold-blooded) असतात. समुद्राचे पाणी खूप थंड असल्याने त्यांचे शरीर थंड पडते. त्यामुळे समुद्रातून बाहेर आल्यावर ते तासनतास खडकांवर ऊन खात बसतात, जेणेकरून शरीराचे तापमान पुन्हा वाढवता येईल.
जेव्हा समुद्रात अन्नाची (शेवाळाची) कमतरता निर्माण होते, तेव्हा हे इग्वाना केवळ बारीक होत नाहीत, तर चक्क त्यांची हाडे आणि शरीराची लांबी कमी करतात.
अन्न मुबलक मिळाल्यावर ते पुन्हा त्यांच्या मूळ आकारात येतात. साधरणाता यांचा आकार हा 3 ते 5 फूट असून याचा वजन 2 किलोपासून 12 किलोपर्यंत असते