Namdev Gharal
इन्का टर्न (Inca Tern) हा पक्षी त्याच्या वेगळ्या लुकमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची 'पांढरी मिशी'!
ही खरी मिशी नसून चोचीच्या दोन्ही बाजूला फुटलेले पांढऱ्या पिसांचे पुंजके आहेत. हे पुंजके बाहेरच्या बाजूला वळलेले असल्याने ते हुबेहूब माणसाच्या मिशीसारखे दिसतात.
पक्षी शास्त्रांनुसार, ज्या इन्का टर्नची मिशी जेवढी लांब आणि पांढरी असते, तो पक्षी तेवढाच जास्त निरोगी मानला जातो. जोडीदार निवडताना ही मिशी महत्त्वाची भूमिका बजावते.
इन्का टर्न या पक्ष्याचे रंगरुप आकर्षक असते गडद करड्या (Slate Grey) रंगाचे शरीर व चोच आणि पाय गडद लाल रंगाचे असतात
हे पक्षी प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि चिली या देशांच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. जिथे 'हंबोल्ट' नावाचा थंड पाण्याचा प्रवाह वाहतो, तिथे हे जास्त दिसतात.
इन्का टर्न हे उत्तम शिकारी आहेत. ते समुद्रात सूर मारून लहान मासे पकडतात. कधीकधी ते सी-लायन्स किंवा व्हेल माशांच्या मागे राहून त्यांनी खाऊन उरलेले मासे खातात.
हे पक्षी समुद्रकिनाऱ्यावरील खडकांच्या कपारीत किंवा दगडांच्या ढिगाऱ्यात आपली घरटी बनवतात. अनेकदा हे पक्षी सुरक्षिततेसाठी दुसऱ्या पक्ष्यांच्या रिकाम्या घरट्यांचाही वापर करतात.
दुर्दैवाने, मासेमारीचे वाढते प्रमाण आणि हवामान बदलामुळे इन्का टर्नची संख्या कमी होत आहे. धोक्यात आलेली प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले आहे.