पुढारी वृत्तसेवा
उन्हाळा सुरू होण्यापूर्वी भारतातील निसर्गरम्य ठिकाणे फिरण्यासाठी मार्च हा योग्य महिना आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेले ऋषिकेश (उत्तराखंड) हे गंगेच्या पात्रातील थरारक रिव्हर राफ्टिंग आणि शांत निसर्गासाठी जगप्रसिद्ध आहे.
उंच डोंगर आणि रोमांचक रोड ट्रिप आवडते, त्यांच्यासाठी स्पिती व्हॅली (हिमाचल प्रदेश) हे एक स्वप्नवत ठिकाण आहे.
मेघालयातील डावकी येथील उमंगोट नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की, त्यातील बोटी जणू हवेत तरंगत असल्याचा भास होतो.
धुक्याने वेढलेल्या टेकड्या आणि कॉफीच्या बागांमुळे कुर्ग (कर्नाटक) हे ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण ठरते.
वन्यजीव प्रेमींसाठी जिम कॉर्बेट (उत्तराखंड) राष्ट्रीय उद्यानातील जंगल सफारी आणि निसर्ग भ्रमंती हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
मार्चमधील आल्हाददायक हवामानात मुन्नार (केरळ)च्या हिरव्यागार चहाच्या मळ्यांमध्ये फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
मार्च महिन्यातील स्वच्छ आकाश आणि वाऱ्याचा वेग हा बीर बिलिंगमध्ये (हिमाचल प्रदेश) पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवण्यासाठी अत्यंत पोषक असतो.