स्वालिया न. शिकलगार
गौरव पत्की दिग्दर्शित ललित प्रभाकर-हृता दुर्गुळे पहिल्यांदाच एकत्र दिसतील. दोघांच्या बर्थडेला १२ सप्टेंबरला 'आरपार' रिलीज होईल
अमित कोळी दिग्दर्शित 'झिंग' १९ सप्टेंबर रिलीज होतोय. वडिलांचं तमाशाचा फड उभारण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या लेकाचा प्रवास दाखवण्यात येईल
'दशावतार'मधील पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ प्रदर्शित झालंय. ओंकारस्वरुपने ते गायलं आहे. चित्रपट १२ सप्टेंबरला रिलीज होतोय.
दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे यांचा अभिनय आहे
‘अरण्य’चे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा कलाकार असून १९ सप्टेंबरला रिलीज होईल
सयाजी शिंदे ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ चित्रपट आणताहेत. लेखन अरविंद जगताप, दिग्दर्शन अनुप जगदाळे, निर्माते मनोहर जगताप आहेत
चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळमध्येही प्रदर्शित होणार आहे. साताऱ्यातील तांबवेमधील विष्णू बाळा पाटील यांच्या संघर्षाची कथा उलगडेल
क्रिस्टस स्टीफन दिग्दर्शित 'तू माझा किनारा'चे पोस्टर प्रदर्शित झाले. स्टीफन मुळचे मल्याळी भाषिक असले, तरी हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे
संजय अमर दिग्दर्शित 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' २२ ऑगस्टला येईल. सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे, अनिकेत विश्वासराव यांच्या भूमिका आहेत
रमेश मोरे दिग्दर्शित 'आदिशेष'चे शूटिंग झाले असून रिलीज डेट जाहीर झाली नाही. अरुण नलावडे, आराधना देशपांडे, वैशाली भोसले यांच्या भूमिका आहेत