स्वालिया न. शिकलगार
दत्त जयंती, पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर अभिनेत्री तेजस्वी लोणारी विवाहबंधनात अडकली
तिचे पती समाधान सरवणकर शिवसेना पक्षाचे नेता असल्याचे म्हटले जात आहे
गुलाबी भरजरी शालू, भरगच्च दागिने, लांबसडक केसांची वेणी आणि त्यात माळलेली फुले, अशी लूकमध्ये वधू खूपच सुंदर दिसत होती
तिने परिधान केलेल वर्क केलेले ब्लाऊजदेखील लक्षवेधी ठरले
तर समाधान यांनी मोती कलर शेरवाणी परिधान केली होती
मोठ्या थाटामाटात या कपलचा लग्नसोहळा पार पडला
लग्नाचे मंडप खूपच सुंदररित्या सजवण्यात आले होते
मंडपातील पांढऱ्या फुलांच्या माळांची सजावट केली होती, जी खूपच आकर्षक ठरली