Rahul Shelke
नाशिक न्यायालयाने क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.
त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. माणिकराव कोकाटेंनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे क्रीडामंत्री आहेत.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार माणिकराव कोकाटे हे BSC आणि LLB पदवीधर आहेत.
कुटुंबाकडे 31.35 लाख रुपये रोख तर 36.75 लाख रुपये बँक ठेवी आहेत.
बाँड आणि शेअर्समध्ये 4 कोटी 78 लाख 63 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. पोस्ट ऑफिस खात्यात 1.60 लाख रुपये आहेत.
महिंद्रा थार, इनोव्हा हायक्रॉस, बुलेट, सोनालिका ट्रॅक्टर आणि सोनं अशी मिळून एकूण चल संपत्ती 11.73 कोटी रुपये आहे.
शेती, बिगरशेती जमीन आणि रहिवासी इमारती अशी एकूण अचल संपत्ती 31.05 कोटी रुपये आहे.
माणिकराव कोकाटेंच्या नावे एकूण संपत्ती: 48.36 कोटी रुपये
त्यांच्यावर एकूण कर्ज: 7.75 कोटी रुपये आहे, अटक वॉरंट आणि संपत्तीमुळे कोकाटे सध्या चर्चेत आहेत.