Bird Migration : पक्षी हजारो किलोमीटर स्थलांतराचा प्रवास कसा करतात?

पुढारी वृत्तसेवा

उत्तम पर्यावरणीय परिस्थिती आणि अधिवास शोधण्यासाठी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात.

दिवसा प्रवास करणारे पक्षी सूर्याच्या स्थितीचा उपयोग दिशा निश्चित करण्यासाठी करतात.

पक्षी पृथ्वीच्या अदृश्य चुंबकीय रेषा आणि ध्रुवांची दिशा व कोन ओळखू शकतात. याला मॅग्नेटोरिसेप्शन म्हणतात.

शास्त्रज्ञांच्या मते, पक्ष्यांच्या डोळ्यांमध्ये क्रिप्टोक्रोम नावाच्‍या प्रथिनामुळे  पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची 'दृष्टी' मिळते, जणू ते चुंबकीय क्षेत्र पाहू शकतात.

काही पक्षी स्‍थलांतर करण्‍यात येणार्‍या ठिकाण कधीही पाहिले नसतानाही, स्वत:हून हा प्रवास पूर्ण करतात.

लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पक्षी बरीच चरबी जमा करतात. त्यांचे वजन स्थलांतरापूर्वीच्या वजनाच्या दुप्पट होते.

पक्षी वाढलेला चरबीचा उपयोग स्‍थलांतरावेळी  इंधन म्हणून करतात.

हवेचा विरोध कमी करण्यासाठी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी अनेक पक्षी 'V' आकाराच्या थव्यामध्ये उड्डाण करतात.

काही पक्षी हवेच्या प्रवाहांचा फायदा घेण्यासाठी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी जास्त उंचीवरूनही उडतात.

आर्क्टिक टर्न नावाचा पक्षी सर्वात लांब प्रवास करतो. तो दरवर्षी सुमारे ७० हजार ८११ किलोमीटर इतक्‍या अंतराचा प्रवास करतो.

येथे क्‍लिक करा.