Asit Banage
प्राण्यांच्या जगात निसर्गाचे अनेक आश्चर्यकारक चमत्कार पाहायला मिळतात.
समुद्री घोडा अर्थात ‘सीहॉर्स’ हा त्यापैकीच एक अनोखा जीव आहे.
या प्राण्याचं वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश प्राण्यांमध्ये मादी पिलांना जन्म देते.
मात्र समुद्री घोड्यांमध्ये ही जबाबदारी नर पार पाडतो. त्याची प्रजनन प्रक्रिया वैज्ञानिकांसाठीही कुतूहलाचा विषय आहे.
मादी समुद्री घोडा आपली अंडी नराच्या शरीरावर असलेल्या एका विशेष पिशवीत सोडते.
त्यानंतर नर या पिशवीत अंड्यांची काळजी घेतो आणि त्यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देतो.
सिडनी विद्यापीठाच्या माहितीनुसार, नर समुद्री घोड्याच्या या विशेष पिशवीत अंड्यांचा विकास होतो.
ही पिशवी विकसित होणाऱ्या पिलांना संरक्षण आणि आवश्यक पोषक घटक पुरवण्यास मदत करते.