Apple Fact : कोणते सफरचंद योग्य देशी की विदेशी ? विकत घेताना कोणत्‍या गोष्टींची काळजी घ्यावी

Namdev Gharal

बाजारात सफरचंद घेताना आपण जास्तीत जास्त रंग बघुन घेत असतो किवा क्वचित चव, पण सफरचंद घेताना कोणते आपल्यासाठी फायदेशिर ठरते ते पहावे लागेल

सफरचंद निवडताना फक्त रंग किंवा ते देशी की विदेशी यावर न ठरवता, त्यातील ताजेपणा, गोडवा आणि नैसर्गिक गुणवत्तेवर निर्णय घेणे योग्य ठरते.

आरोग्य, चव आणि पोषणाचा विचार केल्यास स्थानिक/इंडियन (काश्मिरी किंवा हिमाचली) सफरचंद सहसा सर्वात उत्तम पर्याय मानले जातात.

इंडिअन सफरचंद (काश्मिरी / हिमाचली / किन्नौर) वैशिष्ट्ये: हे सफरचंद पूर्ण लाल भडक नसून हलके लाल-पिवळसर किंवा नैसर्गिक पट्ट्या असलेले असतात.

स्थानिक असल्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर पोहोचतात; त्यामुळे त्यावर कृत्रिम मेण (wax) किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज लावण्याचे प्रमाण कमी असते.

हे चवीला रसाळ, नैसर्गिक गोड आणि किंचित आंबटसर (balanced) असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान बाजारात येणारे भारतीय सफरचंद अत्यंत ताजे असतात.

आयात केलेले सफरचंद (उदा. Red Delicious, Washington)

दिसायला अत्यंत आकर्षक, एकसमान आकार आणि गडद लाल भडक रंग. दिसायला हे सफरचंद छान दिसतात आणि क्रंची (कुरकुरीत) असतात.

मेणाचा थर: दूरवरून समुद्रमार्गे प्रवास करून येत असल्यामुळे त्यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी त्यावर फूड-ग्रेड वॅक्स (Wax) आणि रसायने लावली जाण्याची शक्यता असते

अनेकदा फळ जास्त लाल दिसावे म्हणून कृत्रिम रंग किंवा वॅक्सिंग केले जाते. सफरचंद जितके जास्त चकचकीत आणि भडक दिसेल, तितके त्यावर प्रक्रिया झालेली असण्याची शक्यता जास्त असते.

वजन आणि कडकपणा: सफरचंद हातात घेतल्यावर वजनाने थोडे जड आणि दाबल्यावर कडक वाटले पाहिजे. हलके वाटणारे सफरचंद आतून कोरडे असू शकते.

नखे लावून वॅक्स तपासा: फळावर हलकेच नख घासून पहा; पांढरा थर किंवा भुकटी जमा होत असल्यास त्यावर मेणाचा थर असतो.