Makhana Vs Roasted Chana | मखाना की भाजलेले चणे? वजन घटवण्यासाठी कोणता स्नॅक्स उत्तम?

पुढारी वृत्तसेवा

पोषक घटकांनी समृद्ध असलेले मखाना आणि भाजलेले चणे लोकप्रिय आहेत. या दोन्ही पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात आहे

शहरात मखाना हा प्रीमियम हेल्दी स्नॅक म्हणून लोकप्रिय आहे. तर भाजलेले चणे स्वस्त असल्यामुळे ग्रामीण तसेच निमशहरी भागात अधिक पसंतीचे आहेत

मखाना हा कमी कॅलरीचा स्नॅक असल्यामुळे कॅलरीबाबत जागरूक असणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे

भाजलेल्या चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पोट भरल्याची भावना दीर्घकाळ टिकते. तसेच त्यामध्ये मध्यम प्रमाणात कॅलरीज असतात

'जर्नल ऑफ करंट रिसर्च इन फूड सायन्स'च्या मते, मखाना मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून वजन व्यवस्थापनातही मदत करू शकतो

अमेरिकन जर्नल ऑफ मेडिकल न्यूट्रिशन'नुसार, भाजलेले चणे प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी आणि पोट भरल्याची भावना टिकवण्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात

वजन कमी करण्याच्या दृष्टीने मखाना आणि भाजलेले चणे हे दोन्ही चांगले स्नॅक पर्याय आहेत. आहारात दोन्हींचा समावेशही करता येतो

हलका आणि कमी कॅलरीसाठी मखाना चांगला पर्याय आहे. तर दीर्घकाळ पोट भरलेले आणि प्रथिने व फायबरसाठी भाजलेले चणे अधिक फायदेशीर ठरू शकतात

आहारात दोन्ही पदार्थांचा मर्यादित प्रमाणात समावेश करून विविधता आणि पोषणाचा समतोल राखणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो

येथे क्लिक करा