Eating Fruits After Meal | जेवणानंतर फळे खाल्ल्याने पोटात आंबतात? काय आहे यामागचे सत्य?

पुढारी वृत्तसेवा

फळे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर मुबलक प्रमाणात असते

जेवणानंतर फळे खाल्ल्याने पचनावर परिणाम होतो का?, यामागे कितपत तथ्य आहे? याबाबत समजून घेणे महत्त्वाचे ठरते

आपली पचनसंस्था विविध प्रकारचे अन्न एकाच वेळी पचवण्यासाठी सक्षम असते. त्यामुळे फळे आणि इतर पदार्थ एकत्र पोटात गेल्याने त्यांचे पचन होत नाही, असे नाही

जेवणानंतर फळे खाल्ल्याने ती पोटात कुजतात, आंबतात किंवा पचनक्रिया बिघडते, असा समज आहे. मात्र, याला ठोस वैज्ञानिक आधार नाही

मात्र, जेवणानंतर लगेच भरपूर प्रमाणात फळे खाल्ल्यास काही लोकांना पोट फुगणे, गॅस होणे किंवा पोट जड वाटणे अशा तक्रारी जाणवू शकतात

काही व्यक्तींना जेवणानंतर संत्री, मोसंबी किंवा अननस यांसारख्या आंबट फळांचे सेवन केल्यास ॲसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ जाणवू शकते

जेवणानंतर फळे खाणे किंवा रिकाम्या पोटीच फळे खावीत किंवा जेवणानंतर किमान दोन तासांनीच फळे खावीत, असा कठोर नियम नाही

अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, मानवी पचनसंस्था विविध प्रकारचे अन्न एकत्र पचवू शकते. त्यामुळे फळे इतर अन्नपदार्थांसोबत खाल्ल्याने ती पोटात कुजतात, याला शास्त्रीय आधार नाही

पोषणविषयक उपलब्ध संशोधनानुसार फळे खाण्याची ठरावीक वेळ निश्चित करण्यापेक्षा दररोज पुरेशा प्रमाणात फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे

येथे क्लिक करा