Makhana : या काटेरी कमळाच्या बिया आहेत बहुउपयोगी!

Namdev Gharal

मखाना हा आजकाल डायट करणार्यांसाठी खूप उपयुक्त ठरतो आहे. अनेकांना वजन कमी करायचे असते पण वारंवार भूक लागते, क्रेव्हिंग होते यासाठी मखाना भेळ खूप उपयुक्त ठरते

मखाना म्हणजे कमळ फुलांचे बी असा अनेकांचा समज असतो. पण मखाना हा 'Euryale ferox' (काटेरी कमळ किंवा फॉक्स नट प्लांट) नावाच्या पाण्याच्या वनस्पतीपासून मिळतो.

या वनस्पतीच्या बियांवर प्रक्रिया करून, भाजून त्यांना लाह्यांसारखे फोडले जाते, ज्याला आपण मखाना म्हणतो. ही वनस्पती दिसायला कमळासारखी दिसत असली तरी ते शास्त्रीयदृष्ट्या अस्सल कमळ (Lotus) नाही.

नुसता मखाना याला कोणतीही चव नसते. तो भाजून कुरकुरीत करुण, त्‍यावर बेसीक मसाले व मीठ तसेच कांदा लिंबू पिळून योग्य भेळ तयार करता येते.

लो कॅलरी आणि वजन नियंत्रण करण्यासाठी मखाना भेळ खूप उपयुक्त ठरते मखाण्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते, ज्यामुळे वजन वाढत नाही. कमी कॅलरीमध्ये पोट भरते

यामध्ये मुबलक प्रमाणात डाएटरी फायबर असते, जे पचनक्रिया सुरळीत ठेवते. फायबरमुळे दीर्घकाळ भूक लागत नाही आणि ओव्हरईटिंग टळते.

मखाण्यातील वनस्पती-आधारित प्रोटीन शरीरातील स्नायू बळकट ठेवण्यास मदत करते.फॅट बर्न होण्याच्या प्रक्रियेत आणि मेटाबॉलिझम वाढवण्यात प्रोटीन फायदेशीर ठरते.

मखाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. शुगर क्रेव्हिंग्स कमी होऊन वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

तळलेले आणि अनहेल्दी स्नॅक्सऐवजी मखाना भेळ हा हलका आणि पौष्टिक पर्याय आहे. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हा एक उत्तम फॅट-फ्री स्नॅक ठरतो.

भेळमध्ये काकडी, टोमॅटो, डाळिंब आणि कांदा घातल्याने आवश्यक व्हिटॅमिन्स व खनिजे मिळतात. लिंबाचा रस आणि जिरे पावडर पचनक्रिया अधिक वेगवान करतात.

वडाच्या कोवळ्या पारंब्या