Namdev Gharal
आपल्याकडे वटवृक्ष किंवा वडाचे झाड धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र आहे, वटपौर्णिमेला सुवासिनी याची पुजा करतात. आर्युवेदात हा खपू महत्वाचा वृक्ष आहे, साल पारंब्या पाने याचा खपू उपयोग होतो
या झाडाचे वैशिष्ट्ये म्हणजे याला पारंब्या येतात म्हणजेच फांद्यांना आधार देण्यासाठी फांद्यावरच मुळे उगवतात व ही जमीनीकडे प्रवास करत झाडाला पुन्हा आधार देताता
याच पारंब्यांचे कोवळे खोड तर पोटविकरांवर खूप उपयुक्त असतात. या कोवळ्या पारंब्याचे काही कोवळे तुकडे उपाशीपोटी चावल्यास किंवा याचा चमचाभर रस घेतल्यास मुळव्याधीवर आराम पडतो
आर्युवेदानुसार विशेषतः ज्यांना रक्ती मूळव्याध (Bleeding Piles) किंवा गुदद्वाराजवळ तीव्र जळजळ आणि सूज येण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा पारंपरिक आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतो.
या कोवळया पारंब्यांमध्ये कषाय (Astringent) गुणधर्म असतात. त्यामुळे मूळव्याधीतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि शौचाच्या वेळी होणारा रक्तस्त्राव लवकर थांबण्यास मदत होते.
वडाच्या ताज्या कोवळ्या पारंब्यांचा १-२ चमचे रस किंवा सावलीत वाळवलेल्या पारंब्यांचे चूर्ण (१ चमचा) ताज्या, आंबट नसलेल्या ताकात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास उत्तम आराम मिळतो.
कोवळ्या पारंब्यांचे चूर्ण किंवा रस पोटदुखी, जुलाब, अपचन आणि गॅसच्या समस्येवर गुणकारी मानला जातो. हे आतड्यांमधील जळजळ कमी करण्यास मदत करते.
कोवळ्या पारंब्यांची पेस्ट करून खोबरेल तेलात उकळून लावल्यास किंवा त्याचे नियमित सेवन केल्यास केस गळणे कमी होते, केसांची मुळे मजबूत होतात आणि केस दाट होण्यास मदत होते.
कोवळ्या पारंब्या चावून खाल्ल्याने किंवा दात घासल्याने हिरड्यांमधून रक्त येणे, दातदुखी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. यामुळे हिरड्या नैसर्गिकरीत्या घट्ट होतात.
मुळव्याधीसाठीचा हा उपाय लोकपरंपरेने चालत आलेले ज्ञान व आर्युवेदानुसार आहे, उपाय करण्यापूर्वी तुमच्या रोगाचा तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.