तणाव, चिंता आणि नैराश्याला दूर ठेवा, मानसिक आरोग्य जपा, जाणून घ्या सोप्या टीप्स!

पुढारी वृत्तसेवा

फक्त आजारी न पडणेच नव्हे, तर मन प्रसन्न आणि विचार सकारात्मक असणे म्हणजेच खरे मानसिक आरोग्य.

File Photo

दररोज फक्त १५ मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवा. ही वेळ ध्यान, वाचन, चालणे यासाठी द्‍या.

File Photo

हलकासा व्यायाम किंवा योगासने मन आणि शरीर दोन्ही सशक्त ठेवतात.

मनात काही असेल आणि ते व्‍यक्‍त करण्‍यास अडचणीत असतील तर  लिहा. यामुळे तुमच्‍या मनावरील ताण खूप कमी हाेण्‍यास मदत हाेते

File Photo

तुम्‍ही सलग काही दिवस तणावग्रस्‍त परिस्‍थितीचा सामना करत असाल तर जवळच्‍या व्‍यक्‍तीबरोबर चर्चा करा.

दररोज काही वेळासाठी मोबाईल/सोशल मीडियापासून दूर राहा. यामुळे तुमचं मन शांत हाेण्‍यास मदत होईल.

श्वसनाचे व्यायाम नियमित करा. केवळ ५ मिनिटे अनुलोम-विलोम केल्याने मन स्थिर होण्‍यास मदत हाेते.

दररोज तुमच्‍या आयुष्‍यात घडवून गेलेली सकारात्मक गोष्ट लिहा. यामुळे आपल्या विचारांची दिशा बदलते.

तुम्‍हाला उदास किंवा निराश वाटत असेल तर मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडे तत्‍काळ सल्‍ला घेणे फायदेशीर ठरते.

येथे क्‍लिक करा