स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री माधवी निमकर स्टार प्रवाहच्या तुझ्या सोबतीने मालिकेत झळकणार आहे
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी या तिच्या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली
आता पुन्हा ती खलनायिका बनून तायडीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालीय
माधवी म्हणाली, 'मला काहीतरी नवं आव्हानात्मक करायचं होतं, म्हणून ६ महिने ब्रेक घेतला'
'या सहा महिन्यात कुटुंबाला वेळ दिला. तायडीसाठी विचारणा झाली तेव्हा होकार दिला'
'तायडी इतरांना गिल्ट देऊन काम करवून घेण्यात तरबेज आहे'
'तिचा नशिबावर अजिबात विश्वास नाही, हवी असलेली गोष्ट तिला मिळवायची असते'
'प्रचंड फिटनेस फ्रिक असलेल्या तायडीला खाण्यात पदार्थाच्या जागी कॅलरीज दिसतात'