मोनिका क्षीरसागर
गॅस सिलिंडर नेहमी हवेशीर आणि मोकळ्या जागी ठेवावा.
स्वयंपाक पूर्ण झाल्यावर गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करण्याची सवय लावा.
गॅसची रबरी नळी (Tube) खराब झाली नाही ना, याची वेळोवेळी खात्री करून घ्या.
सिलिंडर कधीही उष्णता किंवा उघड्या ज्वालांच्या जवळ ठेवू नका.
गॅस शेगडी चालू असताना ती सोडून कुठेही बाहेर जाऊ नका.
सिलिंडरच्या कोणत्याही फिटिंगशी किंवा भागांशी स्वतःहून छेडछाड करू नका.
गॅस गळतीची शंका आल्यास त्वरित 1906 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.
तुमची थोडीशी सतर्कता घराला मोठ्या अपघातापासून वाचवू शकते.