Asit Banage
अनेकदा ब्रश करूनही काही लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या असते.
डॉक्टरांच्या मते, तोंडाचा वास येण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता हे आहे.
जेंव्हा आपण पुरेसे पाणी पीत नाही, तेव्हा तोंड कोरडे पडू लागते आणि हीच दुर्गंधीची पहिली पायरी ठरते.
वैद्यकीय भाषेत तोंड कोरडे पडण्याच्या या स्थितीला ‘जेरोस्टोमिया’ असे म्हणतात.
आपल्या तोंडातील लाळ नैसर्गिक ‘माऊथवॉश’प्रमाणे काम करते. ती तोंडातील अन्नाचे कण साफ करण्यास मदत करते.
जेव्हा तोंड कोरडे पडते, तेव्हा लाळ कमी तयार होते आणि नैसर्गिक साफसफाईचे चक्र बिघडते.
लाळ कमी झाल्यामुळे तोंडात बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. हे कीटाणू दात आणि हिरड्यांमध्ये अडकलेले अन्नाचे कण सडवण्यास सुरुवात करतात.
यामुळे तीव्र दुर्गंधी येते. त्यामुळे दिवसभरात किमान तीन ते चार लिटर पाण्याचे सेवन करावे.