पुढारी वृत्तसेवा
उन्हाळा सुरू होताच बाजारात आंब्यांची रेलचेल सुरू होते, परंतु अनेक आंबे “ऑर्गॅनिक” या नावाखाली रासायनिक पद्धतीने पिकवले जातात
आंबे खरेदी करण्यापूर्वी केवळ आकर्षक सोनेरी रंगावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासन आणि तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे
आंबे नैसर्गिकरीत्या पिकू देण्याऐवजी ते कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर करून पिकविले जातात, त्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जाते
रसायनाने पिकवलेला आंबा खाताना जिभेवर किंवा घशात थोडी जळजळ जाणवू शकते
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्यांचा रंग एकसारखा नसतो. त्यात हिरवा, पिवळा आणि कधी कधी लाल छटा दिसतात
कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे बहुतेक वेळा पूर्णपणे एकसारखे पिवळे किंवा सोनेरी दिसतात
नैसर्गिक आंबा सर्व बाजूंनी सारखा मऊ लागतो. रासायनिक आंबा काही ठिकाणी मऊ तर काही ठिकाणी कडक असू शकतो
नैसर्गिक आंब्याला देठाजवळ गोड आणि तीव्र सुगंध येतो. रासायनिक आंब्याला एकतर वास नसतो किंवा रसायनांचा उग्र वास येतो
बादलीभर पाण्यात आंबे टाका. जे आंबे खाली बसतात ते नैसर्गिक असतात, तर पाण्यावर तरंगणारे आंबे बहुधा रसायनाने पिकवलेले असतात