Taste of mouth | तापात तोंडाची चव गेलीय? मग 'हे' नक्की करा...

मोनिका क्षीरसागर

तोंडाची चव पुन्हा मिळवा

तापानंतर तोंडाला आलेली कडवटपणा घालवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील रामबाण

डाळिंबाची जादू

तापात तोंडाला चव नसेल, तर ताजे डाळिंब खा; यामुळे जिभेची मरगळ दूर होऊन ताजेतवाने वाटेल

लोणच्याची गोडी

जेवणाची रुची वाढवण्यासाठी ताटात लिंबाचे गोड लोणचे नक्की घ्या, यामुळे तोंडाचा कडवटपणा लगेच कमी होतो

पुदिना आणि लिंबू

कोमट पाण्यात पुदिना आणि लिंबू रस घालून त्याचे घोट घोट सरबत प्यायल्याने तोंडाला छान चव येते

आवळ्याचा चमत्कार

तापात जिभेला चव येण्यासाठी आवळा सुपारी चघळणे हा एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे.

Canva photo

खास घरगुती चाटण

किसलेले आले, लिंबू रस आणि थोडे काळे मीठ यांचे चाटण घेतल्यास जिभेवरील पांढरा थर स्वच्छ होतो

भूक वाढवण्यासाठी

हे नैसर्गिक उपाय केवळ तोंडाची चवच सुधारत नाहीत, तर तुमची भूक वाढवण्यासही मदत करतात

आरोग्याची काळजी

औषधांच्या उष्णतेमुळे गेलेली चव परत मिळवण्यासाठी या उपायांसोबतच भरपूर पाणी प्या आणि विश्रांती घ्या, जेणेकरून तुम्ही लवकर बरे व्हाल

येथे क्लिक करा...