Antibiotics Side Effects | अँटीबायोटिक्स घेताय? 'हे' ८ दुष्परिणाम नक्की जाणून घ्या!

पुढारी वृत्तसेवा

अँटीबायोटिक्समुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन बिघडते. यामुळे पोट दुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

इन्फेक्शनविरुद्ध लढण्यासाठी शरीर आपली पूर्ण ऊर्जा वापरत असते. त्यामुळे अँटीबायोटिक्स घेत असताना शरीरात कमालीचा थकवा जाणवू लागतो.

अनेकदा रिकाम्या पोटी अँटीबायोटिक्स घेतल्यास मळमळ किंवा उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.

पोटातील पाचक बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे पचनक्रिया बिघडते, परिणामी अन्नावरची वासना उडते आणि भूक लागत नाही.

काहींना अँटीबायोटिक्सची ॲलर्जी असू शकते. यामुळे त्वचेवर लाल चट्टे पडणे, खाज सुटणे किंवा पित्त उठणे अशा समस्या दिसू शकतात.

जुलाब (डायरिया) होणे हा अँटीबायोटिक्सचा सर्वात सामान्य दुष्परिणाम आहे. पोटातील 'गुड बॅक्टेरिया' नष्ट झाल्यामुळे जुलाबाचा त्रास होतो.

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे (Dehydration) किंवा औषधाच्या थेट परिणामामुळे काही रुग्णांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

काहींना अँटीबायोटिक्समुळे शरीराचे संतुलन बिघडू शकते किंवा ग्लानी येऊन चक्कर आल्यासारखे वाटू शकते.

अँटीबायोटिक्स घेताना डॉक्टरांचा सल्ला अनिवार्य आहे. स्वतःच्या मनाने औषध घेणे आरोग्‍यासाठी नुकसानकारक ठरु शकते.

येथे क्‍लिक करा.