Sandan valley | ट्रेकर्सचा स्वर्ग, सूर्य प्रकाशही न पोहचणारी गूढं सावल्यांची दरी : सांदन व्हॅली

Namdev Gharal

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदराजवळ असलेल्या सांदन व्हॅलीला महाराष्ट्राचे 'ग्रँड कॅन्यन' किंवा 'व्हॅली ऑफ शॅडोज' (सावल्यांची दरी) म्हणून ओळखले जाते

जमिनीला पडलेल्या एका मोठ्या नैसर्गिक भेगेमुळे ही दरी निर्माण झाली आहे. ही दरी सुमारे २०० ते ४०० फूट खोल आणि २ किलोमीटर लांब आहे.

आशियातील दुसरी सर्वात खोल दरी: हा निसर्गाचा एक मोठा चमत्कार असून आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांदन व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो.

सूर्यप्रकाशही पोहोचत नाही: ही दरी इतकी अरुंद आणि निमुळती आहे की, अनेक ठिकाणी थेट सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे दिवसाही इथे सावली आणि गूढ शांतता असते.

ट्रेकर्सचा स्वर्ग: ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ड्रीम डेस्टिनेशन आहे. अजस्र खडकांवरून मार्ग काढणे, रॅपलिंग करणे आणि पाण्यातून चालणे अशा अनेक साहसी गोष्टी इथे अनुभवता येतात.

कस लावणारे रॅपलिंग: या ट्रेकमध्ये साधारण २५ ते ४५ फुटांचे खडकाळ पॅचेस आहेत, जिथून खाली उतरण्यासाठी दोरीच्या साहाय्याने 'रॅपलिंग' (Rappelling) करावे लागते.

थंडगार पाण्याचे पूल: ट्रेक दरम्यान कंबरेएवढ्या थंडगार पाण्यातून चालण्याचा एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो, जो थकवा दूर करतो.

किल्ल्यांचा वेढा: ही दरी अलंग, मदन, कुलंग या सह्याद्रीतील सर्वात कठीण किल्ल्यांनी आणि आजोबा पर्वत तसेच कळसूबाई शिखराने वेढलेली आहे.

रात्रीचे कॅम्पिंग आणि स्टारगेझिंग: ट्रेक पूर्ण झाल्यावर मोकळ्या आकाशाखाली टेंट लावून कॅम्पिंग करण्याची मजा काही वेगळीच असते. प्रदूषण नसल्यामुळे इथून चमचमणारे तारे आणि आपली आकशगंगा स्पष्ट दिसतात.

नोव्हेंबर ते मार्च (हिवाळा आणि उन्हाळा) हा काळ इथे जाण्यासाठी सर्वोत्तम आहे. पावसाळ्यात या दरीतून पाण्याचा प्रवाह खूप वेगवान असतो, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्यात हा ट्रेक पूर्णपणे बंद असतो.