लोहगड किल्ल्याला किती पायऱ्या आहेत? ऐतिहासिक गडाची खास माहिती

पुढारी वृत्तसेवा

लोहगड किल्ल्याला किती पायऱ्या आहेत?

पावसाळ्यात ट्रेकला जाण्यापूर्वी जाणून घ्या या ऐतिहासिक गडाबद्दलच्या खास गोष्टी.

लोहगड कुठे आहे?

पुण्यापासून सुमारे 64 किमी, तर लोणावळ्यापासून अवघ्या 15 किमी अंतरावर लोहगड किल्ला आहे. पावसाळ्यात हा गड पर्यटकांनी गजबजलेला असतो.

किल्ल्यावर किती पायऱ्या आहेत?

लोहगडाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 250 ते 300 दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या चढण्यासाठी तुलनेने सोप्या आहेत.

समुद्रसपाटीपासून किती उंच?

लोहगड किल्ला समुद्रसपाटीपासून 1,033 मीटर उंचीवर आहे. त्यामुळे गडावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य मन मोहून टाकते.

चार भव्य दरवाजे

लोहगडावर गणेश, हनुमान, नारायण आणि महादरवाजा असे चार ऐतिहासिक दरवाजे आहेत. यावरील कोरीव काम आजही पर्यटकांचे लक्ष वेधते.

'विंचूकाटा'ची अनोखी ओळख

लोहगडावरील विंचूकाटा हा सर्वात प्रसिद्ध भाग आहे. विंचवाच्या शेपटीसारखा दिसणारा हा बुरूज पर्यटकांचे खास आकर्षण ठरतो.

शिवरायांशी असलेला इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये लोहगड जिंकला. सुरत मोहिमेत मिळालेला खजिना काही काळ याच किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आला होता.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

भारत सरकारने 26 मे 1909 रोजी लोहगड किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.

ट्रेकसाठी योग्य किल्ला

लोहगडाचा ट्रेक नवशिक्यांसाठीही सोपा मानला जातो. पावसाळ्यात हिरवागार निसर्ग, धुकं आणि धबधबे यामुळे हा अनुभव अधिकच अविस्मरणीय ठरतो.

लोहगडला जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

आरामदायी बूट, रेनकोट, पाण्याची बाटली आणि आवश्यक काळजी घेऊनच ट्रेकला जा.

श्रद्धा कपूरने 'ईठा'साठी किती मानधन घेतले?

येथे क्लिक करा