पुढारी वृत्तसेवा
15 कोटींवरून थेट 20 कोटी!
श्रद्धा कपूरच्या नव्या फीची चर्चा; बॉलिवूडमध्ये खळबळ
'ईठा'मधील दमदार भूमिका
श्रद्धा कपूर लवकरच 'ईठा' चित्रपटात वीठाबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा लूक आणि टीझरला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली आहे.
'ईठा'साठी किती घेतले मानधन?
मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरने 'ईठा' चित्रपटासाठी तब्बल 15 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
आता पुढच्या चित्रपटासाठी नवी मागणी
'ईठा'नंतरच्या पुढील प्रोजेक्टसाठी श्रद्धाने 20 कोटी रुपये फीची मागणी केल्याची चर्चा सुरू आहे.
कोणत्या चित्रपटात दिसणार?
रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर भारतपेचे सहसंस्थापक अशनीर ग्रोवर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारू शकते.
कोणती भूमिका साकारणार?
या चित्रपटात श्रद्धा अशनीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन यांची भूमिका साकारू शकते, अशी चर्चा आहे.
दीपिका पदुकोणला टक्कर?
जर श्रद्धाला 20 कोटी रुपये मानधन मिळाले, तर ती फीच्या बाबतीत दीपिका पदुकोणच्या बरोबरीला पोहोचू शकते.
याआधीही झाली होती चर्चा
'पुष्पा 2'मधील एका डान्ससाठी श्रद्धाला विचारणा झाली होती. मात्र तिच्या वाढलेल्या फीमुळे ती संधी हुकल्याची चर्चा होती.
अधिकृत घोषणा नाही
श्रद्धाच्या नव्या चित्रपटाची किंवा तिच्या 20 कोटींच्या फीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ही माहिती सध्या मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे.
15 कोटींवरून 20 कोटींपर्यंतचा प्रवास?
श्रद्धा कपूरच्या वाढलेल्या मानधनाची चर्चा खरी ठरते का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.