Liver Health | लिव्हर राहील एकदम 'क्लीन'; आहारात ठेवा या १० भाज्या!

पुढारी वृत्तसेवा

क्लोरोफिलने समृद्ध असलेल्या पालेभाज्या विषारी घटक निष्प्रभ करण्यास आणि यकृताच्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेस मदत करतात.

ब्रोकोली, फुलकोबी, कोबी सारख्‍या भाज्‍या यकृतातील डिटॉक्सिफायिंग एन्झाइम्सचे उत्पादन वाढवतात आणि हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.

बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेले गाजर यकृताच्या कार्याला मदत करते आणि सूज कमी करते.

बीटरूटमध्ये नायट्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे यकृत स्वच्छ करण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

लसणामध्ये सल्फर संयुगे यकृतातील एन्झाइम्स सक्रिय करतात, ज्यामुळे विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

कांद्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि संयुगे डिटॉक्सिफिकेशनला मदत करतात आणि यकृतावरील ताण कमी करतात

भारतीय आहारात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कारले, यकृताचे कार्य सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते

पचायला हलकी आणि सोपी असलेली दुधी भोपळी, यकृतावरील भार कमी करण्यास आणि शरीरात पाण्याची पातळी राखण्यास मदत करते

टोमॅटोमधील लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट यकृताच्या पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करते.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.