स्वालिया न. शिकलगार
आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री मिथीला पालकर सध्या चर्चेत आहे
दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या 'भूतबंगला' चित्रपटात मिथीलाची वर्णी लागली आहे
अक्षय कुमार आणि तब्बू सारख्या दिग्गज कलाकारांसोबत ती आता हॉरर-कॉमेडीचा तडका लावताना दिसणार आहे
मिथीलाने आपल्या करिअरची सुरुवात 'लिटिल थिंग्ज' या वेब सीरिजमधून केली होती
तिने मराठी चित्रपट 'मुरंबा', बॉलिवूडमध्ये 'कारवां' सारख्या चित्रपटांतून आपली चुणूक दाखवली
मात्र, 'भूतबंगला' हा तिच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे
जाहिरात असो वा चित्रपट वा ओटीटी, प्रत्येक प्लॅटफॉर्ममध्ये परफेक्ट अभिनय तिने साकारला आहे
अक्षय कुमारसोबत काम करणे तिच्यासाठी मोठी पर्वणी आहे