पुढारी वृत्तसेवा
आई-बाबा होणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद प्रवास असतो, पण त्यासाठी शरीराची तयारी असणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही गर्भधारणेचा (Conception) विचार करत असाल, तर तुमच्या आजच्या सवयी उद्याच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
जेवणात जंक फूड टाळा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि ड्राय फ्रूट्सचा समावेश करा.
अति व्यायाम किंवा व्यायामाचा पूर्ण अभाव दोन्ही घातक आहे. दररोज ३० मिनिटे चालणे किंवा योगासने करा.
मानसिक तणावामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. शांत राहण्यासाठी मेडिटेशन किंवा छंदा जोपासा.
धूम्रपान आणि मद्यपान प्रजनन क्षमतेवर (Fertility) वाईट परिणाम करतात. ही सवय आजच सोडा.
शरीराला रिपेअर होण्यासाठी किमान ७-८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा.
कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा प्लॅनिंग सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घ्या.