sleep research study | ७ तासांपेक्षा कमी झोप थेट आयुष्यावर घाला! जाणून घ्‍या नवीन संशोधन

पुढारी वृत्तसेवा

निरोगी आयुष्यासाठी आहार आणि व्यायामाइतकीच झोपेचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, जर तुम्ही दररोज ७ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर तुमचे आयुष्य कमी होऊ शकते.

ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीने (OHSU) केलेल्या संशोधन स्लीप अ‍ॅडव्हान्सेस या प्रसिद्ध नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या संशोधनातून असे समोर आले आहे की, अपुरी झोप हा घटक आहार किंवा व्यायामापेक्षाही आयुर्मानावर अधिक परिणाम करतो.

संशोधकांनी २०१९ ते २०२५ या कालावधीतील अमेरिकेतील विविध राज्यांमधील डेटाचा सखोल अभ्यास केला.

आहार आणि व्यायामपेक्षाही झोपेचा आयुर्मानावर प्रभाव अधिक दिसून आला आहे, असे अभ्यासक प्रोफेसर अँड्र्यू मॅकहिल यांनी म्हटले आहे.

प्रत्येकाने दररोज ७ ते ९ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, असे नवीन संशोधन स्‍पष्‍ट करते.

संशोधकांच्या मते, झोप केवळ मेंदूला विश्रांती देत नाही, तर ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक असते.

झोप पूर्ण झाल्यामुळे शरीराची झीज भरून निघते आणि मानसिक आरोग्यही उत्तम राहते.

पुरेशी झोप न मिळाल्यास मधुमेह, हृदयविकार आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

चांगली झोप केवळ तुम्हाला ताजेतवाने ठेवत नाही, तर तुमचे आयुष्यही वाढवते, असे डॉ. मॅकहिल यांनी स्पष्ट केले आहे.

येथे क्‍लिक करा.