पुढारी वृत्तसेवा
सकाळी काही पेये रोज पिल्यास शरीरात पाणी पुरेसे राहते, विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. किडनीतील जळजळ कमी होऊन आरोग्य चांगले राहते.
लिंबू पाणी सायट्रिक ॲसिड प्रदान करते. हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ प्रभावीपणे बाहेर काढण्यास देखील मदत करते.
क्रॅनबेरी ज्यूस अँटीऑक्सिडंट्सने असल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करते.
ग्रीन टी अतिरिक्त कॅलरीशिवाय चयापचयला मदत करते.
जिरे पाणी पचन क्षमता वाढवते. शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकत मूत्रपिंडाचा भार कमी करते.
व्हिटॅमिन सीने समृद्ध असणारे आवळा ज्यूस अँटीऑक्सिडंट संरक्षण सुधारते. किडनीला विषारी पदार्थ आणि जळजळीपासून वाचवते.
आल्याचा चहा मूत्रपिंडांमध्ये रक्ताभिसरण सुधारतात.
मेथी पाण्यामधील विरघळणारे फायबर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.