benefits of lemon : जेवणात लिंबू, जीवनात आरोग्य..! : जाणून घ्‍या ७ मोठे फायदे

पुढारी वृत्तसेवा

कोणत्‍याही पदार्थांत लिंबू रस पिळल्‍यास चवीत फरक पडतो त्‍याचबरोबर त्‍याचे आरोग्‍यासाठी अनेक लाभही आहेत. लिंबात असणार्‍या व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि सायट्रिक ॲसिडचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूया.

लिंबामध्ये व्हिटॅमिनसीचे प्रमाण अधिक असल्याने, ते पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. यामुळे शरीराला संसर्गाशी लढण्‍यास मदत मिळते.

लिंबाचा आंबटपणा पचनक्रिया वाढवणारे रस आणि पित्त यांना उत्तेजित करतो.त्यामुळे पोट फुगणे, अपचन आणि अन्न पचण्याची प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.

लिंबामध्ये पेक्टिन फायबर असते. ते पोट भरल्याची भावना वाढवते, खाण्याची इच्छा कमी करते. आहारावर नियंत्रण ठेवण्यास मदत झाल्‍याने वजन कमी होण्‍यास मदत होते.

लिंबामध्‍ये असणारे फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. धमन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका कमी होतो.याचा नियमित वापर रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करतो.

लिंबामधील सायट्रिक ॲसिड मूत्रातील सायट्रेटची पातळी वाढवते.हे सायट्रेट कॅल्शियमला बांधून मूत्रपिंडात खडे तयार होण्यास प्रतिबंध करते.

लिंबू त्वचेचे संरक्षण करण्‍यास पोषक असून व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि जखम लवकर बरी होण्यास मदत होते.

लिंबात असणार्‍या व्हिटॅमिन सी वनस्पतीजन्य पदार्थांमधून मिळणाऱ्या नॉन-हेम लोहाचे शोषण सुधारते. यामुळे, विशेषत: शाकाहारी लोकांसाठी ॲनिमिया (रक्ताची कमतरता) टाळण्यास मदत होऊ शकते.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.