पुढारी वृत्तसेवा
आयुर्वेदाचे महान ऋषी आणि 'अष्टांग हृदयम्' या ग्रंथाचे जनक महर्षी वाग्भट्ट यांनी आहाराच्या नियमांविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
वाग्भट्टांचा मते जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे हे आरोग्यासाठी अपायकारक असते. ते अनेक गंभीर व्याधींचे मूळ कारण ठरू शकते.
जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यास पोटातील जठराग्नी मंदावते किंवा पूर्णपणे विझून जाते.
जठराग्नी ही अन्न पचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ही आग शांत झाल्यावर अन्न नीट पचत नाही, उलट त्याचे पचनाऐवजी सडणे सुरू होते.
या अपूर्ण पचनामुळे शरीरात 'विष' म्हणजेच टॉक्सिन्स किंवा 'आम' (न पचलेला आहार रस) तयार होतो. याच 'आमा'ला महर्षी वाग्भट्ट १०३ प्रकारच्या रोगांचे मूळ कारण मानतात.
वाग्भट्ट ऋषींच्या निर्देशानुसार, जेवणानंतर साधारण १ ते १.५ (दीड) तासानंतरच पाणी पिणे योग्य आहे.
पचन प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाल्यावर पाणी पिणे हितकारक ठरते.
जेवणानंतर ताक, दिवसाच्या शेवटी दूध आणि रात्रीच्या शेवटी पाणी प्यावे, असे वाग्भट्ट ऋषी 'अष्टांग हृदयम्' या ग्रंथात सांगतात.