Lemon honey water benefits | ३० दिवस रोज लिंबू-मधाचे पाणी प्यायल्यास काय होते? पाहा ६ मुख्य बदल!

पुढारी वृत्तसेवा

काही सवयी इतक्या सोप्या असतात की त्या फायदेशीर असतील का, असा प्रश्न पडतो.

एक ग्लास कोमट पाणी, त्यात थोडा लिंबू रस आणि चवीनुसार मध, ही एक अतिशय साधी कृती आहे, ती अनेकजण विशेषतः सकाळी करतात.

सलग महीनाभर लिंबू-मधाचे पाणी प्यायल्यास शरीरात होणारे बदल जाणून घेवूया.

'न्यूट्रिएंट्स' (Nutrients) जर्नलमध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार, शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तापमान नियंत्रण आणि ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते.

लिंबातील व्हिटॅमिन 'C' चे सेवन त्वचेचे आरोग्य सुधारण्याशी संबंधित आहे. लिंबू-मधाचे पाणी पोषक तत्वांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते.

'जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री अँड न्यूट्रिशन' मधील एका अभ्यासानुसार, नियमितपणे लिंबू पाणी प्यायल्याने पचन प्रक्रियेला मदत होऊ शकते.

'ओबेसिटी' (Obesity) जर्नलनुसार, जेवणापूर्वी साखरयुक्त पेयांऐवजी लिंबू-मध पाणी घेतल्याने साखरेचे प्रमाणही कमी होते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

'इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्सेस अँड न्यूट्रिशन' मधील संशोधनानुसार, मधामध्ये असणारे 'प्रीबायोटिक' गुणधर्म आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात.

पेडियाट्रिक्स' (Pediatrics) जर्नलच्या अभ्यासानुसार, कोमट लिंबू-मध पाणी पिणे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरीत्या प्रसन्न वाटू शकते.

येथे क्‍लिक करा.