पुढारी वृत्तसेवा
वाढलेलं वजन ही आज मोठी समस्या आहे, पण त्यावर उपाय 'डाएट' नाही तर अन्नावर मनापासून प्रेम करणे हा आहे.
आपल्याला वाटतं की आपण अन्नाचा जास्त आनंद घेतोय, पण तज्ज्ञांच्या मते आपण अन्नाचा 'पुरेसा' आनंद घेतच नाही.
मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या न्यूरोसायंटिस्ट डाना स्मॉल यांच्या मते, आपल्या मेंदूत अन्नाचे संकेत मिळवण्यासाठी दोन मार्ग असतात: एक चवीचा आणि दुसरा डोपामाइनचा.
जेव्हा तुम्ही अन्नाचा सुगंध आणि चव घेता, तेव्हा मेंदूचा 'हाय रोड' सक्रिय होतो आणि तुम्हाला प्रत्यक्ष आनंद मिळतो.
चिप्स किंवा कोल्ड ड्रिंक सारखे पदार्थ मेंदूतील 'लो रोड' सक्रिय करतात. हे पदार्थ चवीपेक्षा केवळ 'डोपामाइन हिट' देतात, ज्यामुळे वारंवार खाण्याची सवय लागते.
न्यूरोसायंटिस्ट डाना स्मॉल यांनी कंटाळवाणे डाएट करण्याऐवजी चविष्ट आणि सकस भाज्यांना प्राधान्य देऊन स्वतःचं २० किलो वजन कमी केलं.
निरोगी राहण्याचा नवा मंत्र 'कमी खाणे' नसून 'उत्कृष्ट आणि चवीने खाणे' हा आहे. स्वतःची आवड मारल्याने इच्छाशक्ती कमकुवत होते.
प्रत्येक घास पूर्णपणे चावून आणि त्याचा आनंद घेऊन खाल्ल्यास जंक फूड खाण्याची इच्छा नैसर्गिकरीत्या कमी होते.
आपलं पोट भरल्याचा संकेत मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी किमान २० मिनिटे लागतात. त्यामुळे सावकाश खाल्ल्यास तुम्ही प्रमाणाबाहेर खाणे टाळता.
ऑटोपायलट' मोडवर जेवल्यामुळे अन्नाची चव समजत नाही आणि आपण जास्त खातो. वजन कमी करायचे असेल, तर जेवताना स्क्रीनपासून दूर राहा.