Lek Ladki Yojana : ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घेणे झाले सोपे; जाणून घ्या अर्जाची नवी प्रक्रिया

Asit Banage

‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज सादर करण्याची गरज राहणार नाही.

राज्य सरकारने अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली असून, लाभार्थ्यांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट अर्ज करता येणार आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे.

अर्ज नोंदणीपासून छाननी, मंजुरी आणि अर्जाची सद्य:स्थिती तपासण्यापर्यंतच्या प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

यापूर्वी लेक लाडकी योजनेसाठी अर्जदारांना जवळच्या अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता.

त्यानंतर हे अर्ज प्रकल्प स्तरावर एकत्रित करून पोर्टलवर नोंदवले जात आणि छाननीनंतर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती.

शासनाच्या विविध योजनांच्या प्रक्रियांचे सुसूत्रीकरण करण्याच्या धोरणानुसार लेक लाडकी योजनेत सुधारणा करण्यात आली आहे.

शासन प्रक्रिया पुनर्रचना अंतर्गत अर्जदारांना स्वतः ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...