स्वालिया न. शिकलगार
पाय-पोटऱ्यांचे दुखणे कधीकधी थकव्यामुळे असते, तर कधी शरीरातील एखाद्या कमतरतेमुळे
तुम्ही दिवसभर जास्त चाललात किंवा एकाच जागी बराच वेळ उभे राहिलात, तर स्नायूंवर ताण येतो
अचानक जड व्यायाम केल्याने स्नायूंमध्ये 'लॅक्टिक ॲसिड' साचते, ज्यामुळे पोटऱ्या दुखतात
शरीरात पाणी कमी झाल्यास स्नायूंना पुरेसा ओलावा मिळत नाही, त्यामुळे स्नायू आखडतात
व्हिटॅमिन D आणि B12 शरीरात या जीवनसत्वांची कमतरता असल्यास दुखण्याचे प्रमाण वाढते
हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम, पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पोटऱ्यांमध्ये पेटके (Cramps) येतात
कंबरदुखी किंवा सायटिका मुळे पायांच्या नसांवर दाब पडतो, ज्याचा त्रास पोटऱ्यांपर्यंत जाणवतो
रक्तातील शुगर वाढल्यामुळे पायांच्या नसा कमकुवत होऊ शकतात