भारतीय घराघरांमध्ये, रात्रीचे शिल्लक अन्न बहुतेक वेळा सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणामध्ये खाल्ले जातात.भारतीय गृहीणींची ही सवय वेळ वाचवण्यासाठी आणि अन्नाची नासाडी टाळण्यासाठी वापरली जात आहे.पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की रात्रीचे शिल्लक अन्न आरोग्यासाठी किती योग्य किंवा अयोग्य आहे ?.रात्रीचे उरलेले अन्न सकाळी खाण्याचे काय परिणाम होतात, ते बघूया.जर अन्न रात्रभर बाहेर ठेवले, तर त्या अन्नामध्ये जिवाणू खूप वेगाने वाढतात, ज्यामुळे अशा अन्नामध्ये विषबाधा होऊ शकते.अन्न जास्त वेळ साठवून ठेवल्यास, त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी होतात.जेवण थंड झाल्यावर किमान 2 तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवले, तरच ते दुसऱ्या दिवसापर्यंत सुरक्षित राहू शकते.तसेच अशा अन्नामध्ये ओलावा जास्त असतो, ज्यामुळे बॅक्टेरिया लवकर वाढतात.नेहमी उरलेले अन्न कमीतकमी 70°C पर्यंत गरम करावे जेणेकरून हानिकारक जिवाणू नष्ट होतील.Cold Rice: फ्रिजमध्ये ठेवलेला भात पुन्हा गरम करून खाणं योग्य की अयोग्य.. काय आहे डॉक्टरांचा सल्ला?.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.