Dosa Recipe: रात्रीच्या उरलेल्या भातापासून कसा करायचा कुरकुरीत डोसा?

Anirudha Sankpal

उरलेला एक वाटी भात, अर्धी वाटी दही, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

या मिश्रणात थोडे जिरे आणि चिमूटभर बेकिंग सोडा मिसळून डोशाचे पीठ तयार करा आणि तव्यावर पसरवून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शेका.

दक्षिण भारतातील 'अक्की रोटी' बनवण्यासाठी शिजवलेला भात, तांदळाचे पीठ, कांदा, कोथिंबीर आणि खवलेले खोबरे एकत्र करून मऊ पीठ मळून घ्या.

या पिठाच्या लहान भाकऱ्या थापून तव्यावर तेल सोडून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतल्यास चविष्ट नाश्ता तयार होतो.

पौष्टिक कटलेट बनवण्यासाठी भातामध्ये किसलेले गाजर, बीट, कांदा, कोथिंबीर आणि उकडलेला बटाटा व्यवस्थित मिसळून घ्या.

यामध्ये भिजवलेला ब्रेड, बेसन आणि कॉर्नफ्लोअर घातल्याने कटलेटला चांगला कुरकुरीतपणा आणि बाइंडिंग येते.

चवीसाठी हिरवी मिरची, गरम मसाला आणि लाल तिखट घालून त्याचे लहान गोळे करून तव्यावर शॅलो फ्राय करा.

भात पुन्हा गरम करून खाण्यापेक्षा अशा प्रकारे डोसा किंवा कटलेट बनवणे हा एक आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय ठरतो.

येथे क्लिक करा