Freezer Coin Trick | घर बंद करून बाहेर पडताय? फ्रीझरमध्ये ठेवा एक रुपयाचे नाणे; कारण वाचून व्हाल थक्क

पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांसाठी घर बंद ठेवून बाहेर जात असाल तर फ्रीझरमध्ये एका ग्लासात गोठवलेल्या पाण्यावर एक रुपयाचे नाणे ठेवावे

ही साधी युक्ती तुम्ही घराबाहेर होता त्यावेळी घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता का, हे ओळखण्यास मदत करू शकते

एक कप किंवा वाटी पाण्याने भरून ती फ्रीझरमध्ये ठेवा. पाणी पूर्णपणे गोठल्यानंतर त्यावर एक रुपयाचे नाणे ठेवा

नाणे वरच्या बाजूलाच असेल तर फ्रीझरमधील तापमान कमी राहिल्याने वीजपुरवठा खंडित झाला नाही, आणि अन्नपदार्थ सुरक्षित असू शकतात, याची खात्री येते

काही काळासाठी वीज गेली असल्यास बर्फ अंशतः वितळून पुन्हा गोठल्यामुळे नाणे थोडे खाली सरकते. अशावेळी फ्रीझरमधील पदार्थांची काळजीपूर्वक तपासणी करावी

फ्रीझरमधील बर्फ पूर्णपणे वितळून पुन्हा गोठल्याने बराच काळ वीजपुरवठा खंडित झाला. अशावेळी मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ यांसारखे लवकर खराब होणारे अन्नपदार्थ खाणे टाळावे

या युक्तीतून वीज किती वेळ गेली, फ्रीझर किती वेळ उघडला गेला किंवा तापमान नेमके किती वाढले, याची अचूक माहिती यातून मिळत नाही

विशेषतः सुट्टीसाठी किंवा काही दिवस घराबाहेर जाणार असाल, तर ही छोटी खबरदारी तुमचे अन्न सुरक्षित आहे की नाही, याचा अंदाज देऊ शकते

तरीही फ्रीझरमधील पदार्थांचा वास, रंग आणि पोत तपासा. मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे वितळले असल्यास ते वापरणे टाळा

येथे क्लिक करा