पुढारी वृत्तसेवा
त्वचेवर चामखीळ ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (human papillomavirus) येतात, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात
चामखीळला कारणीभूत असणाऱ्या HPV व्हायरसचे 100 हून अधिक प्रकार आहेत
चामखीळला warts असे म्हणतात. चामखीळ शरीरासाठी धोकादायक नसतात. मात्र, चामखीळ असल्याने त्वचेच्या सौंदर्याला बाधा येऊ शकते
चामखीळ नखाने कुरतडल्यास स्त्राव शरीराच्या इतर ठिकाणी पसरून त्याठिकाणी चामखीळ येतात
चामखीळ संसर्गामुळे होऊ शकते. रेजर, अंतर्वस्त्रे, टॉवेल, कपडे, साबण, कंगवा आदी वस्तू दुसऱ्याच्या वापरू नयेत
चामखीळचे एकूण पाच प्रमुख प्रकार असून प्रत्येक प्रकारचे चामखीळ शरीराच्या वेगवेगळ्या भागावर येतात, त्यांचे स्वरूपही वेगळे असू शकते
कुठल्याही प्रकारच्या बाह्य त्वचेवरील चामखीळीसाठी मोठ्या ऑपरेशन किंवा औषध उपचारांची गरज भासत नाही
चामखीळ बारीक दोऱ्याने घट्ट बांधल्यास तेथील रक्ताभिसरण थांबून चार-पाच दिवसांत ते कडक होऊन गळून पडते
चामखीळमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्त्रियांनी गुप्तांगावर चामखीळ असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
चामखीळ विषयीची माहिती इंटरनेटवरील उपलब्ध मजकुरातून घेतली आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ल्यानुसार उपचार करून घेणे आवश्यक आहे.