Leatherback Sea Turtle |लेदरबॅक कासव: समुद्रातील एक रहस्यमयी दात नसलेला जीव

Namdev Gharal

लेदरबॅग कासव हे कासव प्रजातीमधील जगातील सर्वात मोठे कासव आहे. ते दिसायला अत्यंत वेगळे आणि विलोभनीय असते

विशेष म्हणजे या कासवांना दात नसतात, पण त्यांच्या घशात काटेरी रचना (Papillae) असते जी त्‍यांचे शिकार असलेल्या जेलीफिशला पकडून ठेवण्यास मदत करते.

सर्व कासवांमध्ये आकाराने सर्वात मोठे असूनही. हे कासव कोणत्याही इतर सरपटणाऱ्या प्राण्यापेक्षा वेगाने प्रवास करू शकते.

याच्या नाव असे का पडले कारण इतर कासावांचे Shell हाडांचे आणि कडक असते, पण लेदरबॅकचे कवच चामड्यासारखे आणि लवचिक असते. म्हणूनच याला 'लेदरबॅक' असे म्हणतात.

याचे वजन अवाढव्य असते जवळपास 300- 600 ते 900 किलोपर्यंत. तर याची लांबी सुमारे ४ ते ६ फूट असते

हे कासव हजारो मैलांचा प्रवास करते. अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागराच्या खोल पाण्यात हे आढळते. विषेश म्हणजे हे ६०-७० किलोमीटर प्रति तास वेगाने पोहू शकते.

एवढे मोठे शरीर असूनही याचा आहार हा मुख्यत्‍व 'जेलीफिश' (Jellyfish) असतो. जेलीफिशची संख्या नियंत्रित ठेवण्यात यांची मोठी भूमिका असते.

याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे लेदरबॅक कासव समुद्रामध्ये सुमारे ४,००० फूट (१,२०० मीटर) खोलीपर्यंत डुबकी मारू शकते. इतक्या खोलीवर जाणाऱ्या काही ठराविक जीवांपैकी हे एक आहे

हे कासव थंड पाण्यातही स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवू शकते, जे इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना (Reptiles) सहसा जमत नाही.

समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण, मासेमारीची जाळी आणि हवामान बदल यामुळे या कासवांची संख्या कमी होत आहे. यांच्या अस्तित्वा‍ला धोका तयार झाला आहे.

सापांना ‘मॅगी’सारखा खाणार पक्षी