Gut Health| रात्री उशिरा जेवताय? पोटाच्या आरोग्याबाबत नवीन संशोधनातून समोर आला 'हा' मोठा धोका!

पुढारी वृत्तसेवा

मानसिक ताण पचनसंस्थेत अडथळा निर्माण करू शकतो, हे आपल्याला माहित आहे.

नवीन संशोधनानुसर, रात्री उशिरा जेवल्याचा परिणाम पोटातील उपयुक्त सूक्ष्मजीवांवर होत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

अमेरिकेतील 'नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन एक्झामिनेशन सर्व्हे' मधील ११,००० हून अधिक सहभागींच्या माहितीचे संशोधकांनी विश्लेषण केले.

संशोधकांनी मानसिक ताण, रात्री उशिरा जेवणे आणि पचनक्रियेतील बिघाड यांच्यातील संबंध तपासला.

ज्‍यांचा BMI, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब याद्वारे मोजला जाणारा शारीरिक ताण जास्त आहे ते रात्री ९ नंतर २५ टक्क्यांहून अधिक आहार घेत असल्‍याचे आढळले.

रात्री उशिरा जेवणार्‍यांना बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा (Diarrhoea) त्रास होण्याची शक्यता १.७ पटीने जास्त असते.

'अमेरिकन गट प्रोजेक्ट'मधील डेटावरून असे दिसून आले की, तीव्र ताण असतानारात्री उशिरा जेवणार्‍यांना पोटाचे विकाराचा धोका २.५ पटीने अधिक असतो.

या अभ्यासाच्या मुख्य लेखिका डॉक्टर हारिका दादिगिरी म्हणतात, "तुम्ही काय खाता यासोबतच तुमच्‍या जेवणाची वेळ महत्त्‍वाची आहे.

संशोधनात असे आढळले की, उशिरा जेवणाऱ्या लोकांच्या पोटातील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या विविधतेत (Microbiome Diversity) लक्षणीय घट होते.

आहार घेण्याची वेळ ही 'गट-ब्रेन ॲक्सिस' (मेंदू आणि पचनसंस्था यांच्यातील संवाद यंत्रणा) द्वारे पोटातील आरोग्यावर तणावाचा प्रभाव अधिक वाढवते.

तणाव, खाण्याच्या सवयी आणि पचन आरोग्य यांचा खोलवर अभ्यास करण्यासाठी अजून संशोधनाची गरज असल्याचेही संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे.

येथे क्‍लिक करा.