Health Alert | सकाळी उठल्याबरोबर पाणी पिताय? थांबा, आधी हे वाचा!

पुढारी वृत्तसेवा

अनेकांना वाटते, की सकाळी पाणी पिणे हा सर्व रोगांवरचा उपाय आहे; पण वास्तव वेगळे आहे.

अमेरिकेतील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ'च्या मते, 'व्हॅसोप्रेसिन' सारखी संप्रेरके रात्रभर शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतात.

निरोगी व्यक्ती सकाळी उठल्यावर शरीराला पाण्याची गरज असतेच; पण त्यासाठी घाई करण्‍याची आवश्यकता नसते.

सकाळी पाणी पिण्यामागे 'डिटॉक्सिफिकेशन' (शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकणे) हे सर्वात मोठे कारण सांगितले जाते.

'डिटॉक्स' केवळ सकाळची प्रक्रिया नसून ती यकृत आणि किडनीद्वारे चोवीस तास चालणारी प्रक्रिया आहे.

'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' नुसार, यकृत आणि किडनी सतत रक्तातील कचरा गाळण्याचे काम करत असतात.

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने अस्वस्थ वाटू शकते. जठरातील आम्ल तात्पुरते सौम्य होते, त्‍यामुळे पोट फुगल्यासारखे वाटू शकते.

शरीराची पाण्याची पातळी राखण्याची स्वतःची यंत्रणा असते. दिवसभर थोडे थोडे पाणी पिणे जास्त महत्त्वाचे आहे.

हलका व्यायाम, पौष्टिक नाश्ता आणि दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते.

पाणी एकदम गटागटा न पिता हळूहळू घोट घोट प्यावे.

येथे क्‍लिक करा.