पुढारी वृत्तसेवा
FBI कडून प्रशिक्षण घेतलेले 'बॉडी लँग्वेज' तज्ज्ञ जुआन मॅन्युएल गार्शिया लोपेझ यांनी खोटेपणा ओळखण्याची एक भन्नाट ट्रिक सांगितली आहे.
लोपेझ यांच्या मते, आपण विचारही केला नसेल अशा शरीराच्या एका अंगावरून समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की नाही, हे समजू शकतं.
व्यक्ती खोटं बोलतोय का यासाठी आपण नेहमी लोकांचा चेहरा किंवा हात पाहतो; पण माणसाचे 'पाय' खोटेपणा ओळखण्यासाठी सर्वात जास्त बोलके ठरतात!
जेव्हा एखादी व्यक्ती अचानक पूर्णपणे स्तब्ध किंवा एकदम ताठ उभी राहते, तेव्हा समजावे की ती घाबरली आहे किंवा काहीतरी लपवत आहे.
खोटं बोलताना किंवा भीतीपोटी चेहरा लाल होणे, डोळ्यांच्या बाहुल्या विस्तारणे किंवा नाकपुड्या फुगणे या गोष्टींवर माणसाचे नियंत्रण नसते.
कोणी म्हणत असेल की 'मी खूप आनंदी आहे', पण त्यांचे शरीर मात्र आखडलेले असेल, तर व्यक्ती खरं बोलत नाहीय हे स्पष्ट होतं.
समोरच्या व्यक्तीच्या पायांची बोटे दरवाजाच्या दिशेने असतील, तर याचा अर्थ भीती, घाई किंवा नावडतीमुळे त्यांना तिथून पळून जायचे आहे!
काही लोक खोट्या शारीरिक प्रतिक्रिया किंवा खोटे हावभाव दाखवून तुमच्या मेंदूला चकवा देऊ शकतात.
त्यामुळे पुढच्या वेळी कोणी खोटं बोलतय असा संशय आल्यास त्यांच्या चेहऱ्यासोबतच पायांच्या हालचालींवरही नक्की लक्ष ठेवा!