पुढारी वृत्तसेवा
आज गणेशचतुर्थी घरोघरी बाप्पाच्या बाप्पांचं आगमन झालं आहे.
मुंबईमधील गणेशोत्सवाची जगभरामध्ये दरवर्षी चर्चा होते.
गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना राज्यभरातील गणेशभक्तांची सर्वाधिक उत्सुकता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असते.
दरवर्षी लाखो भक्त येथे लांबच लांब रांगा लावून दर्शन घेतात.
यंदाच्या वर्षी या ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली असून ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी भक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 92 वे वर्षे आहे.
लालबागचा राजा 1934 पासून मुंबईतील गणेशोत्सवात विराजमान होतो.
मुंबईतील गणेशोत्सवाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि पारंपरिक मंडळ आहे.
लालबागचा राजाच्या मूर्तीची भव्यता पाहून आणि त्याचे आशिर्वाद घेऊन भाविक धन्य होतात.
मूर्तीभोवती विविध धार्मिक चिन्हे, वाद्य आणि मंत्र-जप सुरू असतात, यामुळे भक्तांसाठी आध्यात्मिक वातावरण निर्माण होते.