Namdev Gharal
लेडी ॲमहर्स्ट पक्षी हा आपल्या सौंदयर्सासाठी विषेश प्रसिद्ध आहे. रंगीबेरंगी आणि नक्षीदार पिसांमुळे हा सुंदर दिसतो
तीतर कुळातील हा पक्षी असून हे लाजाळू असतात हवेत उडण्यापेक्षा हा जमीनीवर चालणे जास्त पसंत करतो
डोक्यावर पांढऱ्या रंगाची हुडसारखी पिसे आणि त्यावर काळे पट्टे हे अतिशय आकर्षक दिसतात.
मानेभोवती हिरव्या रेषांची जाळी हार घातल्यासारखी दिसते हे त्याला वेगळेपणा देते.
पाठीवर निळसर-हिरवट पिसे, तर छातीवर लाल व हिरव्या छटा दिसतात.
या पक्ष्याचे नाव भारतातील ब्रिटिश गव्हर्नर-जनरलच्या पत्नी लेडी सारा ॲमहर्स्ट यांच्या नावावरून ठेवले गेले. त्यांनी १८२८ मध्ये हा पक्षी इंग्लंडमध्ये नेला.
८०–९० सेंमी लांब, काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचे नक्षीदार शेपूट हे त्याचे सौंदर्य अधिक खुलवतात
या पक्ष्यांमधील मादी मात्र करडसर-तपकिरी रंगाची असते. या फरकामुळे नराचे सौंदर्य आणखी ठसठशीत वाटते.
याचे अनोखे रंग व लांब शेपूट यामुळे हा पक्षी जगभरातील प्राणिसंग्रहालये, खासगी पक्षी संग्राहक व बागांमध्ये ठेवला जातो
हा मूळचा चीन आणि म्यानमारच्या पर्वतीय जंगलांमध्ये आढळतो. ब्रिटनमध्ये 19व्या शतकात पहिल्यांदा हा आणला व याची जगभरात ओळख झाली.